Skip to main content

पालकत्वाची "ब्लूप्रिंट" (वर्कशॉप)

Workshop Poster

वर्कशॉप विषयी

मुलाच्या जन्मापासून ते मूल सहा वर्षांचं होईपर्यंत त्यांच्या वाढीचे आणि विकासाचे नेमके कोणते टप्पे (milestones) असतात? हे टप्पे आपलं मूल गाठत आहे का हे कसं तपासायचं? मुलाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी व्हावी ह्यासाठी पालकांनी काय करावं? ह्या वयाच्या मुलांच्या पालकांसाठी सुदृढ, सजग आणि समृद्ध पालकत्व म्हणजे नेमकं काय? ते कसं करावं? हे प्रश्न अनेक पालकांच्या मनात असतात. 

ह्या महत्वाच्या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे देणारं वर्कशॉप आम्ही आयोजित करत आहोत. प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल ह्यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या बालमानसोपचार क्षेत्रात केलेल्या कामाच्या आधारे हे वर्कशॉप तयार केलं आहे. 

हे केवळ एक व्याख्यान नाही, तर हे एक प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे. ह्यामध्ये मुलांच्या विकासामागच्या शास्त्रीय संकल्पना समजावून सांगितल्या जातीलच शिवाय अनेक exercises मधून आपल्या मुलाच्या विकासाचे टप्पे तपासण्याची टूल्स पालकांना दिली जातील. 

वर्कशॉपमधील विषय

ह्या वर्कशॉपमध्ये पुढील पाच विषय असतील: 

  • विकासाचे टप्पे (Developmental Milestones): वयानुसार मुलाची वाढ योग्य दिशेने होत आहे का?
  • स्वभाव आणि पिंड (Temperament): तुमच्या मुलाचा मूळ स्वभाव कसा आहे?
  • भावनिक बंध (Attachment Pattern): मुलाचे पालकांशी असलेले नाते (Bonding) कसे आहे?
  • शब्दसंपत्ती (Vocabulary): मुलाला किती नवीन शब्द माहिती आहेत आणि त्याचे बोलणे कसे विकसित होत आहे?
  • झोपेच्या सवयी (Sleep Patterns): मुलाची झोप आणि त्याच्या वेळापत्रकाचे नियोजन.
  • दैनंदिन जीवनातील क्रिया (Activities of Daily Living): अंघोळ, जेवण, कपडे घालणे यांसारख्या रोजच्या गोष्टींमध्ये मूल वयानुसार किती स्वावलंबी होत आहे?

वर्कशॉपचे स्वरुप: 

वर्कशॉप संमिश्र (Hybrid) स्वरुपाचे असेल. 

  • दोन तासांचे प्रास्ताविक सत्र (live online on Zoom) आणि प्रश्नोत्तरे
  • दोन आठवडे WhatsApp ग्रुपवर tasks आणि चर्चा (आपल्या सवडीनुसार रोजची १५ मिनिटे देणे अपेक्षित)
  • एक तासाचे समारोपाचे सत्र (live online) आणि प्रश्नोत्तरे

वर्कशॉपचे फलित (Outcome)

कार्यशाळेच्या शेवटी, तुमच्या निरीक्षणांच्या आधारे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या मुलासाठी 'वैयक्तिक पालकत्व आराखडा' (Personalised Parenting Plan) तयार कराल.