चंचल आणि अस्वस्थ मुल ही सर्व पालकांसाठी आता काळजीची गोष्ट आहे. एका जागी शांतपणे बसता येणे आणि लक्ष इकडे तिकडे न जाता हातातले काम व्यवस्थित संपवणे हे शिक्षणासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारची त्रासदायक चंचलता आणि अस्वस्थता मुलांमध्ये वाढते आहे का? असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. अनेक मुले ही इतकी अस्वस्थ असतात की अटेंशन डेफिसेट डिसऑर्डरचे (ADD / ADHD) निदान चपखल बसेल अशी सर्व लक्षणे दिसतात. उपचार करण्याची सुद्धा गरज पडते.
यामध्ये पालक म्हणून आम्हाला काय करता येईल? मुलांना कुठल्या प्रकारची कौशल्य शिकवता येतील? निदान असो वा नसो, घातक चंचलता कमी करता येईल का? हा सर्व पालकांचा एक नेहमी प्रश्न असतो.
हा प्रश्न सोडवण्यासाठीच किंटसुगी व्हिलेज आणि पेरेंट अकॅडमी या दोन संस्था पालकांसाठी वर्षभर चालणारा एक कार्यक्रम सुरू करत आहोत. दर महिन्याला दोन तासाची एक कार्यशाळा असेल. ज्यामध्ये आपल्याला व आपल्या मुलांना मानसिक स्वस्थपणा यावा आणि स्थिर बसून काम करण्याची प्रवृत्ती वाढवता यावी यासाठीचे विविध उपक्रम राबवले जातील. त्यातली कौशल्य आपल्याला शिकवली जातील. आपण घरी मुलांबरोबर ही कौशल्ये वापरू शकाल. ज्या मुलांना स्वतः याबद्दल काही करायची इच्छा आहे त्या मुलांना देखील मदत केली जाईल.
बाल मानसोपचातज्ज्ञ डॉ भूषण शुक्ल हे या कार्यशाळेचे संचालन करतील. या कार्यशाळेबद्दलची सविस्तर माहिती आणि चर्चा करण्यासाठी हे लेक्चर आहे. ह्याचे नाममात्र नोंदणी शुल्क ₹२०० येथे भरता येईल.
हे लेक्चर किंटसुगी व्हिलेज, झाला हाऊसिंग सोसायटी, मॅक्डोनाल्डस कोथरुड मागे, पुणे ३८ येथे होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: +91 93717 05599