आपल्या मुलाला स्पर्धात्मक पातळीवर बुद्धिबळ खेळायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? शालेय वयात स्पर्धात्मक खेळ खेळल्याचा अभ्यासावर अन करियरवर परिणाम होतो का? आपल्या मुलात हा खेळ खेळण्याचं टॅलेंट कसं ओळखावं? ते असल्यास त्याच्या विकासासाठी काय प्रयत्न करावेत? मुलांच्या सर्वांगीण विकासावर स्पर्धात्मक खेळाचा काय परिणाम होतो?
बुद्धिबळासारखा खेळ ऑनलाईन खेळणे आणि प्रत्यक्षात खेळणे ह्यात काय नेमका फरक आहे?
ह्या सारख्या असंख्य पालकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर चर्चा करायला, येत आहेत दोन छत्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध बुद्धिबळ प्रशिक्षक जयंत गोखले आणि प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल.
आम्ही पालक ह्या आमच्या व्हिडियोकास्ट मधील पुढचा एपिसोड नक्की पहा आणि कसा वाटतोय ते सांगा!
आपल्या मुलात अभिनय कौशल्य आहे का हे कसं ओळखायचं? जर असेल आणि त्याला/तिला पुढे जाऊन त्या क्षेत्रात काही करायचं असेल तर पालक म्हणून आपण काय करायचं? नाटक-चित्रपट-वेबसिरीज ही ग्लॅमर असलेली क्षेत्रं करियर करण्यासाठी कशी आहेत? ह्यात जोखीम अथवा धोके काय आहेत? ह्या क्षेत्रांमध्ये अभिनेता म्हणून करियर करण्यासाठी काय करावं लागतं?
ह्या सारख्या असंख्य पालकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर चर्चा करायला, खरंतर, आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि नाट्य दिग्दर्शक विभावरी देशपांडे आणि प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल.
पेरंट ऍकॅडमीच्या "आम्ही पालक" (We, the parents) ह्या पोडकास्ट / व्हिडियोकास्टवरचा नवा एपिसोड नक्की ऐका आणि कसा वाटतोय ते सांगा!
आपल्या मुलात काही कलागुण आहेत का हे कसं ओळखायचं? काही कलागुण दिसलेच तर ते महत्वाचे आहेत का हे कसं समजायचं? त्यांना प्रोत्साहन द्यायचं का? कसं द्यायचं? अभ्यास/ करियर आणि कलागुणांचा विकास ह्यातला conflict कसा हाताळायचा? तसंच, मुलांमध्ये कलागुण नसतील तर केवळ पालकांना वाटतं म्हणून त्यांच्यामध्ये कलागुण विकसित करता येतात का?
ह्या सारख्या असंख्य पालकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर चर्चा करायला, खरंतर, आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत प्रसिद्ध संगीतकार, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल.
आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहोत, पेरंट ऍकॅडमीचा नवा पोडकास्ट "आम्ही पालक" (We, the parents).
पालकांसाठीच्या ह्या पॉडकास्टचा पहिला एपिसोड नक्की ऐका आणि कसा वाटतोय ते सांगा!
Learn strategies for stress free exams from renowned child psychiatrist Dr. Bhooshan Shukla. Get an essential toolkit to help your child put best foot forward critical exams.
Exam time is the most stressful time in the yearly calendar of most Indian families. Children are under pressure to do their best. Parents want to help kids, but feel confused about how much is enough and how much will be harmful for the child. All the activities in the family get focussed around the exams. There's lot of anxiety, stress and even conflicts in the family.
This parenting masterclass will equip you with necessary mental skills to navigate through this challenging time.
Watch the recording of the masterclass for free.
Managed by Free Verse Creations.